पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने (CCEA) तेल विपणन कंपन्यांसाठी (OMCS) इथेनॉल खरेदी दर 2024-25 या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी (1 नोव्हेंबर 2024 – 31 ऑक्टोबर 2025) सुधारित करण्यास मान्यता दिली. प्रदूषण कमी करणे, परकीय चलनाची बचत करणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकित ऊस मूल्य चुकते करण्यासाठी साखर उद्योगाला मदत करणे हे एथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पर्यावरणपूरक पर्यायी इंधनांचा वापर प्रोत्साहित करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 2003 मध्ये EBP कार्यक्रम सुरू केला.
This Question is Also Available in:
Englishहिन्दीಕನ್ನಡ