Cashless Treatment of Road Accident Victims Scheme, 2025
भारत सरकारने नुकतीच "Cashless Treatment of Road Accident Victims Scheme, 2025" ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ आणि मोफत वैद्यकीय उपचार दिले जातील. भारतातील कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर मोटार वाहनाच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस निवडलेल्या रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार मिळतील. उपचारासाठी कमाल मर्यादा रुपये 1.5 लाख असून, ती अपघाताच्या तारखेपासून 7 दिवसांपर्यंत लागू असेल. जे रुग्णालय या योजनेसाठी नियुक्त नाहीत, ती रुग्णालये केवळ आपत्कालीन स्थितीत प्राथमिक उपचार देऊ शकतील. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) राष्ट्रीय पातळीवर या योजनेचे समन्वयक असेल. ही संस्था पोलीस, रुग्णालये आणि राज्य आरोग्य संस्था यांच्यासोबत समन्वय साधून योजना राबवेल. प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात राज्य रस्ते सुरक्षा परिषद ही स्थानिक अंमलबजावणीसाठी प्रमुख संस्था असेल.
This Question is Also Available in:
Englishहिन्दीಕನ್ನಡ